बेळगाव दक्षिण मधुन समितीतुन होसुरकर यांच्या उमेदवारीच्या मागणीचा जोर - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_109

युवाराज्य न्युज नेटवर्क

बेळगाव म्हटल की निवडणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र एकीकरण समिती वारंवार सरस ठरत असते. हे सर्वच जण जाणुन आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात अंतर्गत लाथाळ्या समितीच्याच गळा कापणारी ठरली. मात्र नुकताच पार पडलेल्या शरद पवारांच्या सभेमुळे समिती कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. याच पार्श्वभुमीवर बेळगाव दक्षिण मतदार संघातुन समितीचे निष्ठावान नेते आणि एपीएमसीचे माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर यांच्या उमेदवारीच्या मागणीला जोर धरु लागला आहे.

मनोहर होसुरकर हे गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बळकटीसाठी निष्ठावान कार्यकर्त्यांसारखे कार्य केले असुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी मराठी भाषिक कार्यकर्त्यांसह सर्वांचा विकास साधण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच समितीच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढा उभारण्यात ही त्यांनी सहभाग घेतला होता. शेतकरी म्हणुन समाजात वावरताना अनेक प्रयोग त्यांनी शेती सांभाळली असल्याने त्यांना शहरातील वडगाव भागात एक प्रगतशील शेतकरी म्हणुन ही ओळखु लागले आहेत. जुने बेळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा यशस्वी करण्यात ही त्यांनी मोठा सहभाग दर्शविल्याने शेतकरी वर्गातुन ही त्यांच्या उमेदवारीसाठी समितीकडे मागणी जोर करु लागली आहे.

समितीच्या कार्यात गेल्या अनेक वर्षापासुन त्यांनी दिलेल्या निस्वार्थी कार्याला उमेदवारी देऊन समितीचा आवाज अधिक बुलंद करावा अशी मागणी ही आमच्या न्युज नेटवर्कशी बोलताना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मनोहर होसुरकर यांच्या उमेदवारीच्या मागणीला समिती नेत्यांकडुन दुजोरा मिळेल का? हे पहाणे महत्वपुर्ण ठरणार आहे.

02-Apr-2018 बेळगावYuvarajya News Network
Top