पिता-पुत्रा विरोधात पती-पत्नी? - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_127

चिकोडी आणि निपाणी मतदार संघात उमेदवारी घोळ

युवाराज्य न्युज नेटवर्क-इलेक्शन कॉर्नर विशेष

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन कांही दिवस उलटले तरीही उमेदवारीचा घोळ संपता संपेनासा झाला आहे. विद्यमान आमदारांना सर्वच पक्षांनी उमेदवारी फिक्स केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र निपाणी आणि चिकोडी-सदलगा मतदार संघात विद्यमान आमदारांविरोधात कोण ? असे चित्र असताना सध्या वेगळ्याच चर्चेला उधाण येत आहे. काय आहे परस्थिती जाणुन घेऊयात ग्राऊंड रिपोर्ट....

चिकोडी-सदलगा आणि निपाणी मतदार संघावर सध्या एकसंबाकरांचे वर्चस्व आहे. आणि या दोन्ही तालुक्यातील राजकारणावर नजर टाकल्यास एकसंबा हे दोन्ही तालुक्यांचे माहेरघर ठरले असल्याचे बोलले जाते. या दोन्ही मतदार संघातही विद्यमान आमदारांना तिकिट फायनल झाल्याचे चित्र आहे. मात्र चिकोडी सदलगा विधानसभा मतदार संघात खासदार पुत्र आमदार गणेश हुक्केरींच्या विरोधात भाजपकडुन सहकार नेते आण्णासाहेब जोल्लेच शड्डु ठोकणार? या चर्चेचे घमासान तालुक्यात उठले आहे. आणि त्या पार्श्वभुमीवर जोल्लेंनी यापुर्वी परिवर्तन रॅलीबरोबरच कांही ठिकाणी भाष््य केले होते. यामुळे याला दुजोरा मिळत आहे. मात्र खासदारपुत्राच्या विरोधात आण्णासाहेब जोल्ले उतरल्यास निपाणीतुन आमदार शशिकला जोल्लेंना पराभुत करण्याच्या हेतुने काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते असलेले खासदार प्रकाश हुक्केरींना उतरविण्यात येणार अशी चर्चा सध्या रंगतदार बनत आहे. यामुळे आण्णासाहेब जोल्ले हे चिकोडीत टक्कर दिल्यास आमदार शशिकला जोल्ले यांच्याविरोधात खासदार प्रकाश हुक्केरी रिंगणात उतरणार का? असा सवाल जनतेतुन होऊ लागला आहे. मात्र निपाणीतुन इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी झाली असताना सध्या माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या नावाच्या चर्चेला ही जोर धरला होता. यामुळे नेमकी लढत कोणात होणार हे पाहणे उत्सुकतेचे बनले आहे.

दोन्ही मतदार संघात हुक्केरी आणि जोल्ले ही पारंपारिक लढत झाल्यास एकसंबाकरांत लागलेली ही कडवी झुंज पहाण्यास मतदार राजात चांगलेच औत्सुक्याचे होणार आहे होईल का? पिता - पुत्रा विरोधात पती- पत्नी ही जोरदार लढत हे उमेदवारी निश्चीती नंतर समजणार आहे.

06-Apr-2018चिकोडी Yuvarajya News Network
Top