भाजपाची दुसरी यादी जाहिर हे आहेत उमेदवार - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_176

युवाराज्य न्युज नेटवर्क

काल काँग्रेसने २१८ जणांची यादी जाहिर केल्यानंतर आज भाजपाने दुसरी यादी अधिकृतपणे जाहिर केली आहे. चिकोडी सदलग्यासाठी सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांची उमेदवारी जाहिर झाली आहे. यामुळे निपाणी आणि चिकोडीतुन भाजपातर्फे पती-पत्नी हे लढत देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बेळगाव जिल्ह्यातील अनेक अपेक्षीत उमेदवारीच जाहिर झाले आहेत. दुसऱ्या यादीत ८२ उमेदवारांची नांव असुन आतापर्यंत १५४ जणांना उमेदावारी भाजपाने जाहिर केली आहे.

भाजपाने दुसरी यादी नुकताच जाहिर झाली आहे. यानुसार चिकोडीतुन आण्णासाहेब जोल्ले, गोकाक मधुन अशोक पुजारी, यमकनमर्डीमधुन मारुती अष्टगी यांचे नांव यादीत जाहिर करण्यात आले आहे. भाजपाच्या या यादीमुळे अनेक मतदार संघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत.

16-Apr-2018Yuvarajya News Network
Top