काकांच्या विजयासाठी खा.हुक्केरी निपाणीत तळ ठोकणार ? - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_197

चिकोडी - सदलग्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर

युवाराज्य न्युज नेटवर्क

१२ मे रोजी होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रणांगण दररोज तापतच असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. याच धर्तीवर बेळगाव जिल्ह्यात लागलेल्या चिकोडी-सदलगा आणि निपाणी मतदार संघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागुन राहिले आहे. पती - पत्नीद्वारे भाजपाकडुन टक्कर देण्यात येत असल्याने येथे काँग्रेसचे बडे नेते असलेले खासदार प्रकाश हुक्केरींची भुमिका काय ? हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र कालच प्रकाश हुक्केरींनी बोलविलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत चिकोडी - सदलगा मतदार संघातील उमेदवार आणि खासदार पुत्र गणेश यांच्या विजयाची जबाबदारी आमदार गणेश यांच्यासह कार्यकर्त्यांवर सोपवित आहे. मी उद्यापासुन निपाणी मतदार संघात काँग्रेसच्या विजयासाठी तळ ठोकणार. असे भाष््य केल्याचे वृत आहे. यामुळे आता हुक्केरींच्या निपाणी एंट्रीने उत्सुकता वाढली आहे. याबाबत काय आहे ग्राऊंड रिपोर्ट जाणुन घेऊयात.....

राज्यातील क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या निपाणी आणि दुसऱ्या क्रमांकाचा चिकोडी सदलगा मतदार संघावर सध्या एकसंबाकरांचीच सत्ता आहे. आणि येथील दोन आमदारांवर गत निवडणुकीत समेटाचे राजकारण केले असल्याचा आरोप आहे. यामुळे यंदाही हेच समिकरण होणार का? अशा चर्चेला निवडणुक काळात ऊत आले आहे. मात्र सध्या भाजपाकडुन पती पत्नी
निवडणुक आखाड्यात उतरले असल्याने चुरशीची होणार असे समिकरण आहे. आमदार गणेश हुक्केरी यांच्या विरोधात भाजपाकडुन आमदार शशिकला जोल्ले यांचे पती शह देण्यासाठी सज्ज झाल्याने चिकोडीची निवडणुक सध्या रंगतदार बनत आहे. मात्र या निवडणुकीत एकसंबा वासियांमध्ये विरोधी भुमिका ही वाढल्याचे सध्या दिसत आहे. मात्र हुक्केरींची भुमिका काय ? याकडे लक्ष लागले आहे.

काल झालेल्या सभेत हुक्केरींनी कार्यकर्त्यांवर चिकोडीची जबाबदारी सोपवित निपाणीतुन आपल्या काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मी तळ ठोकणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता निपाणीतील काकांच्या विजयासाठी हुक्केरींची ताकद लागणार आहे असे चित्र हुक्केरींच्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे. चिकोडीत आमदार गणेश हुक्केरींचा विजय निश्चित मानुन ते निपाणीतील राजकिय खेळीवर लक्ष केंद्रीत करीत असल्याने येथील राजकिय समिकरणे बदलणार आहेत. पुर्वीच्या मतदार संघातील १३ गावातील प्रकाश हुक्केरींचे कार्यकर्ते आणि हुक्केरींचा विकासकामांचा झंझावात प्रभाव पाडणार का? जोल्ले विरोधात रणनिती यशस्वी होणार का? याकडे लक्ष लागत आहे. यामुळे दोन्ही मतदार संघातील निवडणुका आता खऱ्या अर्थाने रंगतदार बनु लागल्या आहेत.

21-Apr-2018चिकोडी Yuvarajya News Network
Top