आजपासुन युवाराज्य न्युज आपल्या सेवेत दाखल

news_33

आपल्या सर्वांच्या हक्काचं आणि निपक्ष,निर्भीड न्युज नेटवर्क

नुकताच शुभारंभ; मान्यवरांच्या शुभेच्छा

ग्रामीण भागातील सर्व सामान्य पत्रकार म्हणुन पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत असताना घेतलेला असामान्य अनुभव आणि वाचकांचा मिळालेला सर्वाधिक प्रतिसाद, आमच्या वाचक हितचिंतक मित्रपरिवार यांच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे आणि वेगवान पत्रकारीतेच्या क्षेत्रात एक अनोख योगदान देत समाजाच्या सर्वांगिण विकासाच व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एका नव्या वृतसेवेत आम्ही उतरलो आहोत आज १३ मार्च पासुन आपल्या सेवेत उतरत असुन आपल्या हक्काच, वेगवान, निपक्ष आणि निर्भिड पत्रकारीता या माध्यमातुन करण्यात येणार आहे यासाठी आपले सर्वांचे योगदान महत्वपुर्ण ठरणार आहे नुकताच भारतीय संस्कृतीपणे या वृतसेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रत्येक युवक, नागरिकाकडे असलेल्या इंटरनेट सेवेचा लाभ एका नव्या वृतसेवेच्या माध्यमातुन व्हावा ही इच्छा अनेकांकडुन समजावुन घेतल्यानंतर एक नवे दमदार पाऊल सर्वांच्या हिताच्या दृष्टीने टाकत आहोत आणि यास आपला भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी आशा आपल्या कृपाशिर्वादाने आम्ही ठेवली आहे या वृतसेवेच्या माध्यमातुन सर्वच स्तरातील अनेक बातम्यांचा वेगवान शोध घेण्याचा प्रयत्न आमचा असुन विविध क्षेत्रातील समस्या समाजासमोर आणुन आम्ही एका नवा ध्यास समाजाचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोतयाद्वारे युवा वर्गाचा विकास, सामाजीक जडण घडण, समाजातील मागास व्यक्तींना पाठबळ, समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा, मनोरंजन, महिला विकास, साहित्य दालन, आरोग्य आणि मुख्यत: भावी पिढी असलेल्या युवा वर्गाचा विकास आदी बाबींवर आपण लक्ष केंद्रीत करीत आहोत या उपक्रमाला प्रतिसाद ,सल्ले आम्हाला देवुन उपकृत करावे व ही वृतसेवा सर्वाधिक लोकप्रिय करण्यात आपले योगदान मिळावे हीच ईच्छा!

युवाराज्य न्युज ही वृतसेवा समाजातील विविध घडामोडींचा वेगवान अंदाज घेणारे न्युजपोर्टल असेल तसेच हे निपक्ष, निर्भीड आणि बेधडकपणे कार्यरत असणार असुन याद्वारे कर्नाटक, महाराष्ट्रसह देशभरातील विविध घडामोडींचा अचुक आणि वेगवान वेध घेण्यात येणार आहे याचबरोबर राजकारणातील अचुक घडामोडी, त्या मागचे रहस्य, युवा वर्गाला आकर्षीत करणारे लेख, प्रसिध्दीपासुन अलिप्त असणाऱ्या नव लेखक कवींना संधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांचे लेख, शैक्षणीक मार्गदर्शन, कृषी मार्गदर्शन, आरोग्य विषयक लेख, लाईव्ह विडीओ यासह विविध प्रकारे वाचकांना वृतसेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत यासाठी आपले सहाकार्य आणि मार्गदर्शनाची शिदोरी मोलाची ठरणार आहे
लोभ आहेच तो वृध्दींगत व्हावा!

धन्यवाद
राजेंद्र केरुरे
संपादक युवाराज्य न्युज

13-Mar-2018
Top