दोन टप्प्यात होणार कृषी कर्ज माफ ; कुमारस्वामींची घोषणा - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_353

युवाराज्य न्युज नेटवर्क

कर्नाटकातील संमिश्र सरकार स्थापनेनंतर बहुचर्चित बनलेल्या कर्जमाफीवर आता मुख्यमंत्री कुमारस्वामींनी तोडगा काढला आहे. दोन टप्प्यात कृषी कर्ज माफ करण्याचा सुवर्णमध्य कुमारस्वामींनी साधला आहे. योजना कार्यन्वीत करण्यासाठी पंधरा दिवस लागणार असुन याबाबत सविस्तर चर्चा कलून निर्णय घेण्यात येणार आहे.

विधानसभा सभांगणात मुख्यमंत्री कुमारस्वामी, उप मुख्यमंत्री जी.परमेश्वर, विरोधीपक्ष नेते म्हणुन येडीयुराप्पा ऐवजी गोविंद कारजोळ, जेडीएस नेते बंडेप्पा काशंपुर यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित होते. दरम्यान कुमारस्वामींनी निवडणुकपुर्व काळात दिलेल्या आश्वासनांना बगल देणार नाही ते पुर्ण करणार असे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, एक एप्रिल २००९ ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर केलेल्या कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला संपुर्ण माफी देण्यात येणार आहे. तसेच आगामी पंधरा दिवसात कर्जमाफी योजना कार्यन्वीत करुन शेतकऱ्यांना ऋणमुक्त प्रमाणपत्र घरपोच करण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे एक लाख १४ हजार कोटी कृषी कर्ज आहे. यामध्ये खत विक्रीचेही कर्ज आहे. यामुळे कर्जाची समस्या वाढली असुन कर्जमाफीच्या प्रश्नी मागे सरकण्याचा प्रश्न येतच नाही. यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. अनेक कर्जांना सबसिडी ही आहे तर दुसऱ्या टप्प्यातील शहरांमध्ये विविध रितीने कर्ज वितरीत करुन मार्केटींग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर दोन विभाग नेमण्यात आले असुन पहिल्या टप्प्यात पिक कर्ज संपुर्ण माफ करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शेतकरी पिकांसाठी कितीही कर्ज केले असले तरीही त्याची मर्यादा न पाहता कर्ज माफी देण्यात येईल असे सांगितले आहेत.

उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर बोलताना म्हणाले, कृषी कर्ज माफीला काँग्रेसचा विरोध आहे असे भसविले जात आहे. मात्र याला कोणताही विरोध नसुन संपुर्ण पाठिंबा आहे. कोणत्या पध्दतीने कृषी कर्ज माफ करण्यात येईल यावर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.

30-May-2018Yuvarajya News Network
Top