नृसिंहवाडीत आई - वडिलांसमोरच मुलाने सोडला जीव - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_357

पाय घसरुन घडली घटना

युवाराज्य न्युज नेटवर्क

नशिबाचा खेळ कुणी माणसाच्या हातात नाही असे म्हटले जाते. अशाच प्रकारचा एक कटु अनुभव नृसिंहवाडीत देवदर्शनासाठी आलेल्या पालकांना आला. नृसिंहवाडीच्या दत्त दर्शनासाठी आलेल्या युवकाचा पाय घसरुन पडल्याने आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच जीव गेल्याची घटना आज घडली. श्रीनंदन (वय१९) असे मृत युवकाचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेंगळुरमधील आर.व्ही इंजीनीयरींग कॉलेजमध्ये शिकत असलेला श्रीनंदन हा दुसऱ्या सेमिस्टरची परिक्षा संपवुन आईवडिलांकडे बेळगावला आला होता. दरम्यान बेंगळुरहुन आलेल्या त्याच्या मित्रांसहीत आईवडिलांबरोबर बेळगावातील हिंदवाडीतील घरातुन नृसिंहवाडीला गेले होते. तेथे देवदर्शन घेण्यासाठी गेलेल्या श्रीनंदनचा नदीच्या पायऱ्यांवरुन पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. दरम्यान त्याला मार लागुन आई वडिलांच्या समोरच त्याला जीव गमावावा लागला.

बेळगावातील गोवावेस एलआयसी विभागीय कार्यालयातील अकाऊंट विभाग व्यवस्थापक पीश्रीहरी यांचा तो मुलगा होय. नृसिंहवाडीत घडलेल्या या घटनेने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर आईवडिलांनी जागीच हंबरडा फोडला होता.

31-May-2018नृसिंहवाडी Yuvarajya News Network
Top