कर्नाटकातील कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा: मोर्डे - युवाराज्य न्युज नेटवर्क

news_381

मलिकवाड : युवाराज्य न्युज

उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत आत्महत्येकडे प्रवृत होत आहे. तरीही अनेक वेळा शेतकऱ्यांनी राबलेल्या घामाचे पैसे शेतकऱ्याला मिळण्यास विलंबच होताना दिसते. या परस्थितीवर मात करीत जगणाऱ्या शेतकऱ्याची हाल पाहता कर्नाटकातील कारखान्यांनी मागील हंगाम्यातील ठरलेल्या रक्कमेनुसार दुसरा हप्ता त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत. अशी आर्त मागणी मलिकवाड येथील सर्वसामान्य शेतकरी गंगाराम मोर्डे यांनी व्यक्त केली आहे.

ते मलिकवाड येथे पत्रकारांशी ऊस दरासंदर्भात बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, भारत देश शेतीप्रधान देश म्हणुन गणला जातो. मात्र तरीही याच देशात शेतकऱ्याला आपल्या कष्टाला किंमत मिळावी म्हणुन रस्त्यावर येऊन दरवर्षी झगडावे लागते ही दुर्दैवाची बाब म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचा ऊस दरवर्षी कारखान्याला जात असताना आंदोलने उग्र रुप धारण करीत असतात. यावेळी ठरलेला दर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल बनल्याचे चित्र आम्हाला पहावयास मिळते. अशीच परस्थिती सध्या ही शेतकरी वर्गात असुन ठरल्याप्रमाणे कर्नाटकातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल पुर्ण प्रमाणात अद्याप अदा केलेले नाही. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असुन अर्थिक परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन त्वरीत दुसऱ्या हप्त्याच्या रुपाने कर्नाटकातील कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकित बिले अदा करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

09-Jun-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top