पतंजली देणार ५० हजार जणांना नोकऱ्या ; भरती प्रक्रिया सुरु - युवाराज्य न्युज

news_415

युवाराज्य न्युज नेटवर्क

स्वदेशी मालाच्या विक्रीने देशभरातील बाजारपेठांमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या पतंजलीने मेगा भरती सुरु केली आहे. देशभरातील ५० हजार जणांना पतंजलीने नोकरीत सामील करुन घेणार आहे. याबाबतची जाहिरात नुकताच प्रसिध्द करण्यात आली आहे.

पतंजलीच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० सेल्समनची नेमणुक करण्यात येणार आहे. यामध्ये पतंजलीच्या खाद्य पदार्थांसह विविध उत्पादने विक्री करण्याचे काम मिळणार आहे.

पात्रता: बारावी पास, बी.ए/एम.ए/ एम.बी.ए शिकलेल्या विद्यार्थांना संधी देण्यात येणार आहे. किमान दोन वर्षे नोकरीचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया: या नोकरीसाठी इच्छुकांनी कंपनीच्या अधिकृत सन्मन्वयकांकडे २२ जुन पर्यंत नोंदणी करायची आहे. त्यानंतर २३ ते २७ जुन अखेर निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षणाचे आयोजन पतंजली करणार आहे.

वेतन: या निवड प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना ८ ते १५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे, तसेच शिक्षण व शहरांवर अधारीत पॅकेज देण्यात येणार आहेत.

21-Jun-2018Yuvarajya News Network
Top