केवळ एका दिवसासाठीच मर्यादित राहतोय योग दिन ; निर्माल्य जपण्याची गरज

news_416

युवाराज्य न्युज विशेष

काल भारतासह इतर १७७ देशामध्ये ही जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. मात्र योगा केवळ एक दिन साजरा करण्यापुरताच मर्यादित राहत आहे. दररोज योग करण्याची सवय कांही तुरळक लोकांनाच असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने योग दिनाला जागतिक स्थळावर स्थान प्राप्त झाल्याचे देशभर मानले जाते. मात्र याच योग दिनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. यामुळे या दिनाचे नेमके पावित्र्य जपले जात आहे का? हा प्रश्न आता उभा ठाकत आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी योगाला जागतिक स्थळावर स्थान मिळाले. आणि २१ जुन हा भारतासह १७७ देशांमध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. भारतात पूर्वीपासून आपल्या शरीर सदृढतेसाठी योग केला जातो. मात्र या सर्वाची अधिक प्रसिद्धी झाली नसल्याने योग अनेक लोकांना माहीत नव्हता. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांच्या माध्यमातून देशासह जगभरातील अनेक देशांमध्ये योग करण्यास सुरवात झाली. २०१४ मध्ये मोदींच्या पुढाकाराने योगाला जागतिक स्थळावर स्थान मिळाले. मात्र अनेक लोक प्रसिध्दीसाठी सामूहिक योग करण्यासाठी पुढे येताना दिसतात. योगाचे महत्व सांगणारेच अनेक लोक नियमित योग करण्यासाठी टाळाटाळ करतात. केवळ एक दिवस दिन साजरा करण्यासाठी योग केला म्हणजे त्या विशिष्ट दिनाचा हेतु साध्य होणार नाही हे बाकी सत्य मानावे लागेल.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल साजरा केलेल्या योग दिनावर तथा मोदींच्या वक्तव्यांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवित इथे खायला अन्न मिळण्यासाठी प्रथम सुविधा करा. मग योगाचा विचार करू. शेतकऱ्याचे प्रश्न, भ्रष्टचार असे ज्वलंत प्रश्न असताना पंतप्रधानांनी योगाचे आवाहन करीत आहेत. तर कांही विरोधक मोदी योगाच्या माध्यमातून समाज फोडण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे योग दिनाचे हेतू, निर्माल्य कसे जपता येईल याकडे लक्षकेंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

22-Jun-2018Yuvarajya News Network
Top