True caller वरून दुसऱ्याची माहिती काढताय मग हे वाचा - युवाराज्य न्युज

news_417

युवाराज्य न्युज नेटवर्क

आलेल्या calls अथवा अनोळखी व्यक्तीच्या नंबर्स बाबतीत माहिती काढण्यासाठी सर्रास लोक true caller या apps चा वापर करताना दिसतात. दरम्यान आपल्या नंबर्सची माहिती कोण चेक करीत आहे. याची माहिती आपल्याला मिळणार आहे. याचसाठी एका अनोखे फिचर true caller ने लाँच केले आहे.

आपल्याला दररोज येणाऱ्या कॉल्स बाबत कांही क्षणात माहिते देणारे app म्हणून सध्या लोक true caller कडे पाहत आहेत. दररोज लाखो युजर्स याचा वापर करताना दिसतात. केवळ येणारे कॉल्स नव्हे तर अनोळखी नंबर कोणाचा हे तपासण्यासाठी ही याचा वापर करण्यात येतो. दुसऱ्याच्या नंबर्सची ही माहिती मिळविण्यासाठी वापरले जात होते. मात्र आता आपली माहिती कोण तपासात आहे. याबाबत आपल्याला नोटिफिकेशन मिळणार आहे. यासाठी true कॉलर प्रो नावाने नवीन व्हर्जन लाँच केले आहे. याद्वारे समोरचा व्यक्ती आपल्या नावाने किंवा नंबर्सचा वापर करून माहिती चेक केली आहे. याबाबत नोटीफिकेशन मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर who viewed my profile या option वर क्लिक करणे आवश्यक आहे. तसेच युजरला आपली माहिती देण्यास ही टाळता येणार आहे. यासाठी privacy वर क्लिक करून सर्व सेटींग्स बदलता येतात.

23-Jun-2018Yuvarajya News Network
Top