....आणि म्हणुन...जयडी, मामीने लागीर झालं जी सोडली - युवाराज्य न्युज

news_423

युवाराज्य न्युज : मनोरंजन विशेष

झी मराठी वरील आज्या आणि शितली फेम लागीर झालं जी या मालिकेने महाराष्ट्रासह असंख्य मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. याच मालिकेतील आज्याची मामी (विद्या सावळे) आणि जयडी (किरण ढाणे) या दोघी एकाच वेळी काम सोडले. यामुळे यांची ही एक्झीट रसिकांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ बनले आहे. यावर अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. मात्र त्या मालिका सोडण्याचे नेमके कारण काय जाणुन घेऊयात....

फेडरेशन अध्यक्ष म्हणुन सही करण्याची नक्कल करीत आज्याची मामी (विद्या सावळे) या खुपच गाजल्या होत्या. त्याचबरोबर आज्यावर मनापासुन प्रेम करणारी जयडी (किरण ढाणे) ही आपली भुमिका अगदी उत्साही साकारुन अनेक रसिकांना भुरळ घातली होती. या दोघी ही अचानक मालिका सोडली. याचे नेमके कारण मानधन आहे असे बोलले जातेय. अनेक वेळा मालिकेतील मुख्य भुमिका साकारणाऱ्यांपेक्षा दुसरी भुमिकाच भाव खाऊन जातात. अशाच प्रकारे या मालिकेतही जयडी, मामी आणि राहुल्या या तिन्ही भुमिका भाव खात होत्या. मात्र मुख्य कलाकारांपेक्षा छोट्या भुमिकेतील कलाकारांना तुलनेत मानधन कमीच मिळत असते. याच कारणावरुन त्यांनी आपले मानधन वाढविण्यात यावे अशी मागणी केली होती. याच कारणावरुन खळखट्याक उडाल्याने त्यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. मात्र त्या दोघींनी रसिकांवर मोठ्या प्रमाणावर राज्य केले होते. त्यांच्या अचानक एक्झीटने रसिकांमध्ये नाराजीचा सुर आहे.

26-Jun-2018Yuvarajya News Network
Top