हवामानातील बदलाचा भारतीयांच्या जीवनावर होणार विपरीत परिणाम - युवाराज्य न्युज

news_429

युवाराज्य न्युज : नवी दिल्ली

प्रदुषणाचा निसर्गावर होत असलेला विपरीत परिणाम, वाढते तापमान, आणि हवामानातील बदल यावर त्वरीत उपाय योजना कार्यन्वीत न केल्यास ६० कोटी भारतीयांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार असल्याचा अहवाल जागतीक बँकेने सादर केला आहे.

सध्या हवामानातील विपरीत बदल मानवीय शरिरावर परिणाम करत आहे. अशीच परस्थिती राहिल्यास २०५० मध्ये ६० कोटी भारतीयांना गंभीर परस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. आणि या सर्वाचा परिणाम देशाची जीडीपीवरही २.८ टक्क्यांची घसरण जाणवणार आहे असा अहवाल जागतील बँकेने सादर केला आहे. जागतीक तापमानातील वाढ आणि याचा देशावर होत असलेला परिणाम याबाबत जागतीक बँक अभ्यास करीत आहे.

छतीसगड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उतरप्रदेश, झारखंड, आंध्रप्रदेश आणि पंजाब या राज्यांवर हवामान बदलाचा विपरीत परिणाम जाणवणार आहे. याचबरोबर देशाच्या सिमेवर आणि पर्वत रांगांपासुन आत असलेल्या भागांना ही या बदलाचा अर्थिक फटका जाणवणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. कृषी उत्पन्नातील, आरोग्यसह विविध क्षेत्रातील अनेक बदल तपमान वाढीला कारण ठरणार नसुन २०५० पर्यंत भारताचे सरासरी तपमान १ ते २ डीग्री सेल्सीयसने वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

29-Jun-2018 नवी दिल्लीYuvarajya News Network
Top