शेतकऱ्यांचे दोन लाख पर्यंतचे कर्ज माफ : कुमारस्वामी - युवाराज्य न्युज

news_440

युवाराज्य न्युज: बेंगळुरु

मैत्री सरकारमधील पहिला बजेट आज गुरुवारी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे सहकारी बँकेतील २ लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याची घोषणा मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे. राज्य सरकारवर ३४ हजार कोटींचा भार यामुळे पडणार आहे.

२ लाखपर्यंतचे कर्ज माफ केल्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करुन कर्जफेडीची पावती दिली जाणार असल्याचे ही ते सांगितले. सुमारे २, १८,४८८ कोटींचा अर्थसंकल्प मांडलेल्या कुमारस्वामींनी बळीराजा शेतकऱ्याला तारणारा ठरणारा असा अर्थसंकल्प सादर केला आहे.

मागील काँग्रेस सरकारच्या सर्व योजना पुढे कार्यन्वीत ठेवण्याचा निर्णय मैत्री सरकारने घेतला आहे.

05-Jul-2018Yuvarajya News Network
Top