नामदेव गुरव यांनी कवितेतुन मांडली रस्त्याची दुरावस्था

news_463

युवाराज्य न्युज : बेळगाव

कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या वेंगुर्ला ते कुद्रेमानी दरम्यानच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. चिखलमय रस्त्यातुन प्रवाशी, नागरिक, विद्यार्थांना कसरती करत जावे लागते.मात्र तरीही याकडे शासनाने दुर्लक्षच आहे. येथील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी महाराष्ट्रात जातात. मात्र त्यांना येथुन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या प्रकाराने कुद्रेमानीसह परिसरातील नागरिक बेहाल झाले आहेत. ही व्यथा कुद्रेमानी येथील नामदेव गुरव यांनी कवितेतुन मांडली आहे. आपल्या वाचकांच्या भेटीसाठी ही व्यतिथ कविता.

माझ्या गावचा रस्ता
सीमाप्रश्नामुळे पडला पस्ता
कांही सुचत नाही रस्त्याचा प्रश्न
पंच करतात पंचायतीमध्ये जश्न !!

दोन्ही बाजुला काजु-आंब्याची झाडे
मान खाली घालुन पडतात रस्त्यावर फळे
काय सांगु मी माझ्या रस्त्याची दशा
खड्डे आणि दगड पाडतात फडशा !!उन्हाळा आला की धुळीचे कण
रस्त्यावरुन लोकं फिरतात वणवण
दोन्ही बाजुची घरे होतात लाल
बघणाऱ्यांना वाटते जसा की अग्राचा ताजमहाल

पावसाळा आला की वाटते मजा
गाडीवरुन फिरणाऱ्याला होते कायमची सजा
काय सांगु मी माझ्या रस्त्याची दशा
कधी तरी होईल रस्ता अशी वाटते आशा
म्हणुन सांगत आहे मी माझ्या रस्त्याची दशा!!

- - नामदेव गुरव. कुद्रेमानी

15-Jul-2018 बेळगावYuvarajya News Network
Top