चॉकलेट खाताय..? मग ही वाचा गोड बातमी - युवाराज्य न्युज

news_466

युवाराज्य न्युज नेटवर्क

चॉकलेट म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच... विशेषत: लहान मुले आणि मुलींमध्ये जास्तच... मात्र हे चॉकलेट खाल्याने दातांची समस्या निर्माण होते अशा समजुतीने पालक मुलांना चॉकलेट देण्यास नाक मात्र आता संशोधकांनी चॉकलेट प्रिय लोकांना एक गोड बातमी दिलीय. ती म्हणजे चॉकलेट खाण्याने सौंदर्य खुलुन दिसते असे शास्त्रज्ञांनी संशोधनात म्हटले आहे.

स्वीडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार चॉकलेटमध्ये कॅफिन आणि चरबीचे अंश जास्त असल्याने चॉकलेट जास्त खाणे आरोग्यास योग्य नसल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. मात्र सौंदर्य खुलवण्यासाठी आणि सदृढ आरोग्यासाठी चॉकलेट उतम असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. चॉकलेटमध्ये सिट्रीक आम्ल असल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल तयार करते असे म्हणतात. याबाबत अभ्यास केलेल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या आम्ल पदार्थाने चरबी तयार होत नाही. तर चॉकलेटबरोबर खाण्यात येणाऱ्या पदार्थामुळे कोलेस्ट्रॉल वाढत असते. चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम, आयरन, कॉपर असे पोषकांश असतात. तसेच पॉलीफेनॉल, अँटी अक्सेडेंट अंश ही चॉकलेटमध्ये असतात. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच हृदय संबधीत विकार कमी होण्यास मदत होते. डार्क चॉकलेटच्या सेवनाने रक्तदाब ही सुरळीत होण्यास मदत होते.

४० ग्राम चॉकलेटमध्ये ६ मिली कॅफिनचे प्रमाण आढळुन येते. यानुसार विचार करता दररोज पिणाऱ्या कॉफीमध्ये ही कॅफिनचे ६ मिली प्रमाण आढळुन येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

चॉकलेटच्या अति सेवनाने दाताचे विकार होतात असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र दात किडण्यास केवळ चॉकलेटच कारण असे नाही. तोंडात राहणारे स्टार्च, गोड पदार्थ अडकल्याने दात किडण्यास सुरवात होते. चॉकलेटमध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फेट अंश दातांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

16-Jul-2018Yuvarajya News Network
Top