सदाभाऊंशिवाय राजु शेट्टींची आंदोलनाची धार कायम

news_479

युवाराज्य न्युज : संपादकीय

चार दिवस विविध प्रकारे संपुर्ण महाराष्ट्रात झालेल्या दुधबंद आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दर्शविला. आणि गुरुवारी दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे सरकारने मान्य करताच आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यंदाचे हे आंदोलन स्वाभीमानीतुन मंत्री सदाभाऊ खोत बाहेर पडल्यानंतरचे पहिले मोठे आंदोलन असल्याने आंदोलन यशस्वीतेकडे अनेक नजरा लागल्या होत्या.मात्र हक्काचे पाच रुपये घेणारच या हट्टाला पेटुन उठलेल्या राजु शेट्टींनी सदाभाऊंशिवाय आपल्या आंदोलनाची ताकद दाखवुन दिल्याने ही धार अद्यापही कायम असल्याची भावना निर्माण झाली आहे.

ऊस दर आंदोलनाबरोबरच शेतकरी चळवळीमधुन पुढे आलेले खा. राजु शेट्टी हे कोल्हापुर जिल्ह्यातील एक प्रमुख राजकारणी म्हणुन ही अलिकडच्या काळात ओळखु लागले.जि.प सदस्य, आमदार ते दोनवेळा खासदार अशी त्यांची राजकिय कारकिर्द असल्याने शेतकरी चळवळीबरोबरच राजकारणात सचोटीने हाताळताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवुन देणारा शेतकरी नेता म्हणुन त्यांची देशभर ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच ते आज राज्यस्तरीय, आणि देश पातळीवर ही मोठमोठी शेतकरी आंदोलने यशस्वी केले हे प्रकर्षाने जाणवले गेले. मात्र दरम्यानच्या काळात स्वाभीमानीमध्ये त्यांचे खंदे समर्थक म्हणुन ओळखणारे आणि स्वाभीमानीतील नेते आणि सध्याचे कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर, उल्हास पाटील यांचीही मोठी कामगिरी होताना दिसत होती. गत निवडणुकीच्या वेळेत उल्हास पाटील आमदार म्हणुन शिवसेनेतुन निवडुण गेल्यानंतर स्वाभीमानीशी त्यांचे संबध तुटले. मात्र त्यानंतर विधानपरिषदेत सदाभाऊंना घेऊन मंत्रीपद देऊ केल्यानंतर झालेल्या कांही घडामोडीत सदाभाऊंना स्वाभीमानीला मुकावे लागले.

दरम्यानच्या काळात पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन सदाभाऊंना स्वाभीमानीतुन काढुन टाकण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले. यानंतर खा.राजु शेट्टी आणि सदाभाऊंचे राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर राजु शेट्टींनी जाहीर केलेले हे पहिलेच मोठेच आंदोलन होते. यामुळे सदाभाऊंशिवायच हे आंदोलन यशस्वी होणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले होते. अनेकांनी टीका ही केली होती. मात्र अगदी उत्साहात राजु शेट्टींनी सरकारविरोधात आंदोलनाला प्रारंभ केले. स्वाभीमानी कार्यकर्त्यांनी अगदी जोमात आंदोलनाला राज्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत होते. मात्र याच दरम्यान सदाभाऊंनी माध्यमांपुढे ही आंदोलने कशी असतात. हे मी पाहिलो आहे. हे केवळ पुढील निवडणुकां डोळयासमोर ठेऊन खेळली जाणारी खेळी आहे. असे म्हटल्याने कांही अंशी वाद विकोपाला जाणार असे वाटत असतानाच राजु शेट्टींनी शांततेने आंदोलन करत असल्याचे सुतोवाच करत यावर पडदा टाकला. त्यानंतर मात्र आपली माघार नाही. आम्ही हक्काचे दाम मिळविल्याशिवाय राहणार नाही. दर देणे कसा परवडणारा आहे हे सरकारला सांगितले आहे. असे स्पष्टीकरण देत चौथ्या दिवशी आंदोलन आक्रमक करताच सरकार खा. शेट्टींपुढे नमते घेत शेतकऱ्यांची पाच रुपयांची मागणी मान्य केली. एकंदरीतच केवळ एका नेत्याच्या जाण्याने कांही आंदोलनाला फरक पडत नाही. तर आपली ताकद पणाला लाऊन दर मिळविला. शेतकरी चळवळीत मी मागे पडणारा नाही हे या आंदोलनातुन खा.शेट्टींनी दाखवुन दिले आहे.

20-Jul-2018Yuvarajya News Network
Top