बिग बॉसचा महाअंतिम सोहळा असा ठरणार रोमांचकारी - युवाराज्य न्युज

news_481

युवाराज्य न्युज नेटवर्क

लाखो रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या कलर्स मराठी वरील बिगबॉस मराठीच्या पहिल्या सिजनचा विजेता कोण होणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. हा महाअंतिम सोहळा धमाकेदार बनणार असुन यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे.

ग्रॅंड फिनालेमध्ये पोहचलेल्या पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत, अस्ताद काळे, मेघा घाडे, स्मिता गोंदकर यांचे बहारदार नृत्य पहायला मिळणार आहे. याचबरोबर बिगबॉसच्या घरातुन बाहेर पडलेल्या जुई गडकरी, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे, सुशांत शेलार, ऋतुजा धर्माधिकारी, यांचेही डान्स आपल्याला पहावयास मिळणार आहेत. यासाठी डान्सची जोरदार प्रॅक्टीस करण्यात येत आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनचा महाअंतिम सोहळा आज सायंकाळी रंगणार आहे. यामध्ये कोण विजेता होणार याकडे लक्ष लागले आहे.

22-Jul-2018Yuvarajya News Network
Top