काडसिध्देश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी परगौडा पाटील - युवाराज्य न्युज

news_566

उपाध्यक्षपदी अजयसिंग शितोळे बिनविरोध

प्रतिक कदम : युवाराज्य न्युज,सदलगा

नेज येथील काडसिध्देश्वर को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या अध्यक्षपदी परगौडा बाळगौडा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अजयसिंग जयसिंगराव शितोळे यांची बिनविरोध निवड झाली. याबाबतची अधिकृत माहिती निवडणुक अधिकारी सतिश व्ही. मुसडी यांनी जाहीर केली.

संघाच्या कार्यालयात संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या निवडी दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे घोषीत करण्यात आले.

यावेळी संचालक सुभाष दुरदुंडीमठ,बसगौडा पाटील, अशोक फराळे, आनंदकुमार नाशिपुडे, अशोक बोणे, अब्दुलमजीद नदाफ, दत्ता खिलारे, बाळासाहेब कुराडे, चंद्रकांत नाईक, संचालिका पुजा सुळकुडे, शहाजान जमादार यांच्यासह संस्थेचे मुख्यकार्यनिर्वाहक चंद्रकांत पाटील सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

25-Aug-2018सदलगा Yuvarajya News Network
Top