हालसिध्दनाथसाठी मलिकवाडमधुन आणखी दोन अर्ज - युवाराज्य न्युज

news_571

मलिकवाडमधुन चार जणांचे अर्ज दाखल

युवाराज्य न्युज : मलिकवाड

सध्या सुरु असलेल्या हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मलिकवाडमधील आणखी दोन सभासदांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे मलिकवाडमधुन उमेदवारांची संख्या चारवर पोहचली आहे.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मलिकवाडमधुन किसान प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे चेअरमन पुंडलीक सिद्राम खोत आणि विश्वनाथ देशपांडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले. यामुळे आता येथील उमेदवारांची संख्या चारवर पोहचली आहे.

काल गुरुवारी येथील ए.डी इंगळे आणि त्यांच्या पत्नी अनिता इंगळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दोन जणांचे अर्ज दाखल झाल्याने मलिकवाडकरांमध्ये ही हालसिध्दनाथची निवडणुक चुरशीची होणार? याबाबत चर्चा रंग धरु लागली आहे.

अर्ज भरताना नणदीचे माजी ता.पं सदस्य मल्लु हावलदार, मलिकवाड ग्रा.पं उपाध्यक्ष आप्पासो नाईक, संभाजी पाटील, राजु अंकले, विजय खोत, निवास करजगे, भाऊसो कुडचे,निंगाप्पा गजबर, संभाजी माने, बाळु देसाई, मारुती हावलदार, संदीप मोर्डे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

07-Sep-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top