हालशुगर्स कर्जमुक्त करण्याचे स्वप्न : आण्णासाहेब जोल्ले - युवाराज्य न्युज

news_575

गळतग्यात विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ

वैभव खोत: युवाराज्य न्युज,गळतगा

चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील शेतकरी वर्गाचा प्रतिष्ठेचा असणारा हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत आहे. यामुळे आता काटकसरीने शेतकऱ्यांचे हित जोपासत कारखाना कर्जमुक्त करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांनी केले.

गळतगा येथे हालशुगर्सच्या निवडणुकीत आ.शशिकला जोल्ले आणि सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

गळतगा येथील बिनविरोध निवड झालेले म्हाळाप्पा पिसुत्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेत आण्णासाहेब जोल्ले यांनी हालशुगर्सच्या बाबतीत अनेक निर्णय घेणे आवश्यक आहे. गेल्या कांही वर्षांमध्ये कारखान्याची अवस्था बिकट झाली असुन या सर्वावर तोडगा काढण्यासाठी आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना निवडुन द्या असे आवाहन केले.

यावेळी चंद्रकांत कोठीवाले, एम.पी पाटील, भरत नसलापुरे, समित सासणे यांनी गेल्या कांही वर्षांमध्ये कारखाना चालविताना अनेक अर्थिक स्थितींना सामोरे जावे लागले आहे. सताधारी पक्षाकडुन अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये असलेल्या त्रुटी दुर करुन विकास साधण्यासाठी संधी देण्याचे आवाहन केले.

यावेळी आप्पासाहेब जोल्ले, मल्लाप्पा पाटील, वैभव रांगोळे, मिथुन पाटील, राजु उपाध्ये, मल्लु रुगे, शिवानंद गिंडे, बी.एस पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सभासदांची उपस्थिती होती.


आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

12-Sep-2018Yuvarajya News Network
Top