अकोळच्या ज्ञान विज्ञान प्रदर्शनात मजलट्टी शाळा अजिंक्य

news_583

२४ गावातील शाळांचा सहभाग ; प्रदर्शनाला भरभरुन प्रतिसाद

बसवराज हिरेमठ : युवाराज्य न्युज, अकोळ

अकोळ येथील श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाकडुन आयोजित करण्यात आलेल्या ज्ञान विज्ञान प्रदर्शनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये विविध गावातील २४ शाळांनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये वाहतुक आणि दळणवळण या विषयावर प्रयोग सादरीकरण केलेल्या मजलट्टी सरकारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अजिंक्यपद पटकावित प्रथम क्रमांकाच्या ११ हजार रुपये रोख रक्कमेसह शैक्षणीक साहित्यांचे मानकरी ठरले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि सभोवतालच्या जगतात सुरु असलेल्या वैज्ञानिक बाबींची जागृती करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात अकोळ, चिकोडी, निपाणी, मजलट्टी, श्रीपेवाडी,कुर्ली, सिदनाळ, भोज, सौंदलगा, खडकलाट, नवलीहाळ, चिकालगुड, गडहिंग्लज, कोगनोळी, यमगर्णी, चांद शिरदवाड, चंदुर आदी भागातील शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान विविध विषयांवर प्रयोग सादर करीत उपस्थितांची मने जिंकण्यात आली.

यामध्ये मजलट्टी शाळेने प्रथम, गडहिंग्लजच्या व्ही.डी शिंदे हायस्कुलने ब्लूटूथ आणि होम अप्लायन्सेस यावर प्रयोग सादर करीत द्वितीय क्रमांकाचे सात हजार रुपये रोख आणि शैक्षणीक साहित्याचे मानकरी ठरले. तर स्तवनिधीच्या पी.बी आश्रम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अपंगांसाठी उपयुक्त अशा बहुउद्देशीय वाहनाचे प्रदर्शन करीत तिसऱ्या क्रमांकाच्या ५ हजार रोख रक्कमेसह शैक्षणीक साहित्याच्या बक्षीसावर नांव कोरले. तर चिकालगुड येथील शंकरलिंग मॉडेल हायस्कुल आणि जी.एम हायस्कुल श्रीपेवाडी या दोन शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणुन २ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आले. भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणुन जी. एन कुलकर्णी, एच.एन मठपती, एस.एस नागराळे यांनी काम पाहिले. दोन दिवस सुरु असलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

बक्षीस वितरणास युवराज पाटील, पोपट सिदनाळे , अनिल कागे, मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत , अनिल कागे, गावकामगार राजु पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन रोहित रामनकट्टी यांनी केले.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

21-Sep-2018अकोळ Basavaraj hiremath
Top