निपाणी - नगराध्यक्ष सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

news_597

९ ऑक्टोबरला होणार सुनावणी; और एक बार वेटींग

युवाराज्य न्युज : निपाणी

संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या निपाणी नगरपालीकेच्या नगराध्यक्ष आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. धारवाड उच्च न्यायालयाने आजही सुनावणी लांबणीवर टाकत ९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी जाहीर केली आहे. मा.न्यायाधीश न्यायालयात हजर नसल्याने सदरची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहीती उपलब्ध झाली आहे.

३१ ऑगस्ट रोजी निपाणी नगरपालीकेसाठी चुरशीने मतदान पार पडले असुन यामध्ये काँग्रेसने ११, भाजपाने १३ तर अपक्षांनी ६ जागांवर बाजी मारली होती. अशा पक्षीय बलाबलमुळे सता स्थापनेसाठी रस्सीखेच होणार असल्याची सुत्रे गतीमान होताच प्रारंभी सामान्य महिला असे नगराध्यक्षपदासाठी आरक्षण आले होते. त्यानंतर अचानक आरक्षणात बदल करीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने कांही मंडळींनी धारवाड उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. दरम्यान या निवडीला स्थगिती मिळाली असुन २ वेळा सुनावणी लांबणीवर पडली असताना आज तिसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर पडली आणि और एक बार वेटींग अशी परस्थिती निर्माण झाली आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

04-Oct-2018निपाणी Yuvarajya News Network
Top