बँक ऑफ महाराष्ट्राच्या ५१ शाखा होणार बंद

news_598

नजीकच्या शाखांमध्ये होणार हस्तांतर

युवाराज्य न्युज : पुणे

शहरी भागातुन जास्त उत्पन्न मिळत नसल्याचे कारण पुढे करीत व्याजदर आकारणीचा भाग म्हणुन राज्यातील तब्बल ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय बँक ऑफ महाराष्ट्रने घेतला आहे. याबाबतची अधिकृत माहिती बँक प्रशासनाकडुन बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.

बंद करण्यात येणाऱ्या ५१ शाखांतील ग्राहकांची करंट आणि बचत खाती नजीकच्या शाखांमध्ये हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. यामुळे बंद करण्यात येणाऱ्या शाखांच्या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत चेकबुक आपल्या जवळच्या बँकेत जमा करावेत. त्याचबरोबर बंद करण्यात आल्यानंतर शाखांचे आयएफसी कोड आणि एमआयसीआर कोड बंद करण्यात येणार असल्याची नोंद घेत चालु असलेल्या शाखांचे कोड वापरण्यात यावेत अशी सुचना ग्राहकांना देण्यात येत आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील १९०० शाखांपैकी महाराष्ट्रातील ५१ शाखा बंद होणार असुन विलीनीकरण होणाऱ्या ५१ शाखांची माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

04-Oct-2018 पुणेYuvarajya News Network
Top