व्हॉलीबॉल स्पर्धेतही एकसंबा सी.के कॉलेजची मुसंडी

news_600

प्रशिक्षक अजय मोने यांचे लाभले मार्गदर्शन

युवाराज्य न्युज : एकसंबा

यंदाच्या जिल्हा पातळीवर झालेल्या विविध खेळांमध्ये एकसंबा येथील दि जनता शिक्षण संस्थेच्या सी.के पदवीपुर्व महाविद्यालयाने जाज्वल्य यश संपादन केले आहे. नुकताच गोकाकमधील लक्ष्मणराव जारकिहोळी कॉलेजच्या पटांगणावर पार पडलेल्या चिकोडी शैक्षणीक जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेतही अत्युतम खेळाचे प्रदर्शन करीत सी.के कॉलेजने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.

सी.के पदवीपुर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत विविध कॉलेजच्या संघांना चितपट करीत प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाचे मानकरी ठरल्या. संघातील खेळाडु विद्यार्थीनी श्रुती कमते, शुभांगी कोकणे, उज्वला मठपती, सलिना पानारी, तेजस्विनी बेन्नुरकर, पल्लवी मस्ते किर्ती कमते, प्रियांका हुद्दार यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना प्रशिक्षक अजय मोने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

विजेत्या खेळाडुंचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे, संजय कराळे, प्रा.एम.ए चौगुले व संचालक मंडळींकडुन अभिनंदन करण्यात आले.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

04-Oct-2018एकसंबा Yuvarajya News Network
Top