येडुरसह परिसरात जनावरांची पळवापळवी - युवाराज्य न्युज

news_601

अद्याप चोर मोकाटच ; शेतकरी भितीच्या छायेखाली

युवाराज्य न्युज : येडुर

येडुरसह येडुरवाडी, मांजरी परिसरात गेल्या कांही दिवसांपासुन जनावरांची पळवापळवीचे प्रकार सुरु आहेत. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने चोर मोकाटच आहेत.

पीक नुकसानीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि विविध कारणांनी उत्पादन कमी व आधारभुत किंमतीपेक्षा लागवडींचे दर जास्ती असल्याने शेतकरी तोट्यात आहे. कर्जबाजारीपणाचा बोजा शेतकरी वर्गावर आहे. याच विचाराने घोळत असल्याने अनेक शेतकरी आत्महत्या केल्याच्या ही घटना घडत आहेत. आणि अशातच शेतकरी जोडधंदा म्हणुन करीत असलेल्या जनावरांचीच चोरी येडुरसह, येडुरवाडी, मांजरी, सिध्दापुरवाडी परिसरात गेल्या कांही दिवसांपासुन सुरु असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत २० हुन अधिक जनावरांची चोरी याठिकाणी घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबतची तक्रार करुन ही याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने याबाबत कोणतीही तपास यंत्रणा गतीमान झालेली नाही. परिणामी दररोज रात्री गस्त घालत जागरण करण्याची वेळ शेतकरी, नागरिकांवर आली आहे.

जनावरांच्या पळवापळवीचे सत्र सुरुच असताना गुरुवारी मध्यरात्री घरासमोर लावलेली दुचाकी गावच्या शेजारी असणाऱ्या शेतात नेऊन त्या दुचाकीची दोन्ही चाके लंपास केल्याची घटना घडली आहे. सदरच्या प्रकारामुळे नागरिक भितीच्या छायेखाली राहत असुन पोलीस यंत्रणेही याबाबत सखोल तपास यंत्रणा गतीमान करण्याची मागणी येडुरसह परिसरातुन व्यक्त होत आहे.


आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

06-Oct-2018येडुर Yuvarajya News Network
Top