जोल्लेंच्या वाढदिनी फुंकणार लोकसभेचे रणशिंग ? - युवाराज्य न्युज

news_602

चिकोडी लोकसभेसाठी भाजपात रस्सीखेच

युवाराज्य न्युज : स्पेशल रिपोर्ट

२०१९ मध्ये होऊ घालत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी चिकोडी लोकसभा मतदार संघातुन भाजपाकडुन जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र लोकसभेसाठी यंदा भाजपाकडुन अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. यामध्ये सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची चर्चा ही जोर धरु लागली आहे. यामुळे त्यांच्या ८ रोजी चिकोडीत साजरा होणाऱ्या ५६ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात लोकसभेची रणनिती स्पष्ट करणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चिकोडी लोकसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश हुक्केरी हे नेतृत्व करीत असुन काँग्रेसकडुन आखाड्यात त्यांनाच पुन्हा संधी देणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र याठिकाणी खासदार प्रकाश हुक्केरींचे आस्तित्व मोडीत काढण्यासाठी भाजपाकडुन मोठी टक्कर देण्यात येणार असल्याचे चित्र सध्या मतदार संघात आहे. गत लोकसभा निवडणुकीत खासदार प्रकाश हुक्केरींचा निसटता विजय झाला आहे. यामुळे ते मताधिक्य तोडण्यासाठी भाजप तारेवरची कसरत करणार हे बाकी नक्की मानले जात आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी भाजपाकडुन उमेदवारांची भाऊ गर्दी होणार असुन यामध्ये सध्या राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे, सहकार नेते आण्णासाहेब जोल्ले, माजी खासदार रमेश कत्ती यांचे नांव आघाडीवर आहे. याबाबत खा.डॉ प्रभाकर कोरे हे आपण इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर काल पुन्हा आपले पुत्र अमित यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ते शक्य नाही झाल्यास मी रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहेत.

सोमवार ८ रोजी आण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस चिकोडीमध्ये विविध उपक्रमाने साजरा होणार आहे. दरम्यान चिकोडी-सदलगा विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नार्इंग्लजमध्ये काच कारखाना उभारण्यात येणार आहे. त्याचे ही भुमीपुजन यावेळी करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाची चर्चा लोकसभेच्या दृष्टीने जोर धरली आहे.

सदरचा कार्यक्रम आगामी लोकसभेच्या दृष्टीने महत्वपुर्ण मानला जात आहे. यामुळे या कार्यक्रमातुन भाजपा कार्यकर्त्यांची ताकद लोकसभेसाठी आजमावली जाणार असल्याचे दिसत असले तरीही आगामी रणनिती काय असणार याकडे मात्र मतदार संघाचे लक्ष लागुन राहिले आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा.

06-Oct-2018चिकोडी Yuvarajya News Network
Top