यड्रावमध्ये जावयाने संपविले सासरच्या चौघांची जीवनयात्रा

news_603

कौटुंबिक वादातुन हल्ला ; हल्लेखोर फरार

युवाराज्य न्युज : कोल्हापुर

कौटुंबिक वादातुन टोकाच्या भुमिकेला गेलेल्या जावयाने पत्नीच्या कुटुंबियातील चौघांवर यंत्रमागाच्या लाकडी मान्याने घाव घालुन हत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील शिरगावे मळयात सदरची घटना घडली आहे. हल्ल्यात चौघांचा मृत्यु झाला असुन दोन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातुन जावई प्रदीप विश्वनाथ जगताप हा आपल्या पत्नीसह सासरच्या मंडळींवर हल्ला केला. यामध्ये सासु आणि मेव्हणीचा जागीच मृत्यु झाला होता. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यामध्ये सासु छाया श्रीपती धुमाळ, मेहुणा रोहित श्रीपती धुमाळ, मेव्हुणी सोनाली अभिषेक रावण आणि रुपाली प्रदीप जगताप यांचा मृत्यु झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचुन तपास यंत्रणा गतीमान केली. संशियिताच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. मात्र प्रदीप पोलीसांची गुप्त प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

06-Oct-2018Yuvarajya News Network
Top