येडुर : कर्जाला कंटाळुन तिघांनी संपविले जीवन

news_605

मृत एकाच कुटुंबातील ; कृष्णा नदीत घेतली ऊडी

युवाराज्य न्युज : येडुर

संसाराचा गाडा चालविण्यासाठी काढण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने कंटाळुन येडुरमधील एकाच कुटुंबातील तीघांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. येडुर-कल्लोळ दरम्यान असणाऱ्या कृष्णा नदीत ऊडी घेऊन ते आपल्या जीवनाचा अंत केला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,येडुर येथील एका गरीब कुटुंबियांनी आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी काढण्यात आलेले कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ बनल्याच्या विचाराने एकाच कुटुंबातील तीघांनी नदीत ऊडी घेऊन आत्महत्या केली आहे. सदरचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. यामध्ये कुटुंब मुख्यस्थ अशोक कांबळे (वय-७०), पत्नी निर्मला कांबळे(वय-६०) आणि मुलगा अरुण कांबळे(वय-३०) यांचा मृत्यु झाला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे सीपीआय मल्लनगौडा नायकर, फौजदार गणपती यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकात झाली असुन अधिक तपास तपास अंकली पोलीस करीत आहेत.

07-Oct-2018Yuvarajya News Network
Top