मलिकवाडच्या युवकांची विद्यापीठात ही विजयी पताका

news_607

वेटलिफ्टींग स्पर्धेत एक सुवर्ण तर एक कास्य पदक

युवाराज्य न्युज : मलिकवाड

विविध क्षेत्रात आपल्या महत्वपुर्ण कामगिरीने सैनिक मलिकवाडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकताच राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या क्रिडा स्पर्धेतील वेटलिफ्टींगमध्ये मलिकवाडच्या दोन विद्यार्थांनी एक सुवर्ण तर एक कास्य पदक मिळवुन बाजी मारली आहे.

सैनिकी परंपरा लाभलेल्या मलिकवाडच्या अनेक युवक, नागरिकांनी विविध क्षेत्रात आपली बहुमोल कामगिरी करीत नेहमीच मलिकवाडचे नांव चर्चेत ठेवत असतात. याचप्रमाणे नुकताच बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वेटलिफ्टींग स्पर्धेतील ९६ किलो वजन गटात रोहन रावसाहेब कुंभार याने आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्ण तर महेश गोपाळ ठोंबरे याने ६१ किलो वजन गटात कास्य पदक पटकावित जाज्वल्य यश संपादन केले आहे.
दोन्ही ही युवकांच्या यशाचे मलिकवाडसह परिसरातुन कौतुक होत आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

08-Oct-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top