मलिकवाड ग्रा.पं उपाध्यक्ष आप्पासाहेब नाईक यांचा राजीनामा

news_608

मंगळवारी होणार नुतन निवड

युवाराज्य न्युज : मलिकवाड

मलिकवाड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब नाईक यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. यामुळे आता रिक्त झालेल्या जागेच्या निवडीकडे मलिकवाड वासीयांचे लक्ष लागुन राहिले आहे.

आप्पासाहेब नाईक दोन वेळा ग्राम पंचायतीच्या सदस्यपदी वार्ड क्रमांक १ मधुन निवडुन आले आहेत. दरम्यानच्या काळात दोन वेळा ग्राम पंचायत उपाध्यक्ष म्हणुन तर एक वेळा ग्राम पंचायतीचे अध्यक्षपद भुषविले आहेत. त्यांनी मलिकवाडच्या विकासात अनमोल योगदान दिले असुन त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत. ते गेल्या पंधरादिवसापुर्वी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने मलिकवाड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. त्यांच्या वयक्तीक कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असुन रिक्त पदासाठी उद्या मंगळवारी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणुक होणार आहे.

मलिकवाड ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी के.एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक होणार आहे. नुतन ग्राम पंचायत अध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने अनुसया कोळी यांची वर्णी लागण्याची श्यकता आहे. कोळी यांची निवड झाल्यास अध्यक्ष-उपाध्यक्षपदी महिलाराज्य असणार आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

08-Oct-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top