वेशभुषा स्पर्धेत अनिकेत भाट अव्वल

news_610

सरकारी शाळेच्या विद्यार्थ्याची राज्यपातळीवर निवड

युवाराज्य न्युज : एकसंबा

एकसंबा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचा विद्यार्थी अनिकेत अरुण मोरे (भाट) या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय वेशभुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचे यशाचे कौतुक करीत शाळेत त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उगार येथे नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध वेशभुषा स्पर्धेत अनिकेत मोरे (भाट) याने आपल्या कलेचे उतम सादरीकरण करुन स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविले. त्याच्या गौरवाप्रित्यर्थ मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय देसाई सरकार म्हणाले, या स्पर्धेसाठी अनिकेतने केलेली मेहनत आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन या यशाचे कारण असुन हे यश सरकारी शाळेला गौरवास्पद ठरल्याचे सांगितले.
यावेळी सीआरसी प्रमुख डी.एच कांबळे, एसडीएमसी अध्यक्ष राजु बागडी, मुख्याध्यापिका एन.एस कल्लोळकर, बी.एस बलवान, एस.एन माळी, ज्योती.एन, एच.एम शिडलाळे, ए.बी निर्मळे, आर.आर खैरमोडे, एस.डी पेटकर, एन.व्ही पाटील, एस.वाय मुगळे, सुजाता मोरे, अरुण मोरे, गणपत मोरे उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

08-Oct-2018एकसंबा Yuvarajya News Network
Top