मलिकवाडच्या नुतन उपसरंपचपदी अनुसया कोळी यांची निवड

news_611

आप्पासाहेब नाईक दिले होते राजीनामा ; नुतन निवड बिनविरोध

युवाराज्य न्युज : मलिकवाड

मलिकवाड ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षपदाचा आप्पासाहेब नाईक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणुक कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनुसया रामचंद्र कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणुन तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी के.एस पाटील होते.

प्रारंभी के.एस पाटील यांच्याकडे आप्पासाहेब नाईक यांचा राजीनामा सादर करण्यात आला. त्यानंतर निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी तासाचा अल्टीमेटम वेळ देण्यात आली होती. दरम्यान अनुसया कोळी यांचा उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणुक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ग्राम पंचायत अध्यक्षा अनिता वडगावे यांच्याहस्ते कोळी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मावळते उपाध्यक्ष आप्पासो नाईक यांनी मी एक वेळा ग्राम पंचायतीचे अध्यक्षपद आणि दोन वेळा उपाध्यक्षपद भुषविले आहे. मात्र आमच्याच भगिणी कोळी यांना ही उपाध्यक्षपदाची संधी देण्यासाठी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता त्यांच्या कार्याला सहकार्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले, कांही काळ उत्तम कार्यभार सांभाळुन इतरांना ही संधी देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणे हा त्याग आदर्शदायी असुन सदरच्या निवडीने मलिकवाड पंचायतीवर महिलाराज आल्याचे सांगितले. अविनाश खोत म्हणाले, दसऱ्यात ज्या प्रमाणे महिलावर्गाला पुजले जाते त्याचप्रमाणे महिलेचा सन्मानार्थ उपाध्यक्षपदाची संधी देत पंचायतीने महिलांचा गौरव केल्याचे सांगितले.

यावेळी ग्राम पंचायत कार्यालयाबाहेर नागरिक, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी वर्गाकडुन कोळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य अक्षय इंगळे, गायत्री माने, ललिता शिंदे, किसान पीकेपीएसचे चेअरमन पुंडलीक खोत, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, अजित ठोंबरे, निवास करजगे, भाऊसो कुडचे, विष्णुपंत जाधव, प्रमोद टाकमारे, संजय पाटील, डी.जी नाईक, सहाय्यक पोलीस जी.ए ओरड्डी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

09-Oct-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top