संजय घोडावत यांना शिक्षा होणारच : आण्णासाहेब पाटील

news_617

माणकापुर कामगार मारामारी प्रकरण

युवाराज्य न्युज : चिकोडी

पैेशाच्या जोरावर निर्दोष कामगारांवर अन्याय करणाऱ्या उद्योगपती संजय घोडावत यांना न्यायालयाकडून शिक्षा होणार हे निश्चित असल्याचे स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक आण्णासाहेब पाटील यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना ते म्हणाले घोडावत कंपनीच्या विविध शाखांमध्ये ५ हजार कामगार असून स्वाभिमानी कामगार संघटनेत आहेत. कामगार संघटनेकडून कामगारांना किमान वेतन मिळावे, आठवडी रजा, कामाचे तासठरवून द्यावेत अशा मागण्या होत्या. प्रारंभी मागण्या मान्य केल्या नाहीत.कांही दिवसानंतर मागण्या मान्य करण्याचे सांगून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माणकापूर येथे २०११ साली बोलवून संजय घोडावतसह इतर ६ जणांनी हल्ला करत बेदम मारहाण केली. यात मी देखील गंभीर जखमी झालो होतो.आम्ही त्यांच्यावर केस दाखल करण्यासाठी गेले असता सदलगा, कुरुंदवाड व इचलकरंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केले नाहीत. शेवटी तत्कालीन चिकोडी डीवायएसपींना व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करुन देखीलदेखील त्याची दखल घेतली नाही.

यामुळे १७ फेब्रुवारी २०११ साली चिकोडी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी दाखल केल्यानंतर एप्रिल २०१२ साली ६ जणांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढला. त्यानंतर संजय घोडावत, सतीश घोडावत, अतुल शिंदे, श्यामराव हंडे, दता पुजारी, सचिन चौगुले आदिंना अटक करुन जामिनावर सुटका करुन घेतली. तसेच त्यांनी या न्यायालयात केस खोटी असून मागे घेण्याची विनंती घोडावतसह इतरांनी केली होती. पण कोर्टाने मागणी फेटाळल्याने धारवाड हायकोट खंडपीठात गेले. तेथे देखील मागणी फेटाळल्याने शेवटी पैशाच्या जीवावर कपिल सिब्बलसारख्या ज्येष्ठ वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात अपील केले. पण सर्वोच्च न्यायालयाने ३ वेळा सदर मागणी फेटाळून लावून संबंधतींना चिकोडी न्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर घोडावत यांनी मागीतलेली चिकोडी न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मान्य करण्यात आली. त्यामुळे आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे सांगीतल्यामुळे मुभा न देण्याचा निर्णय दिला.त्यामुळे आजच्य तारखेला चिकोडी न्यायालयात घोडावतसह एकूण ६ जण हजर झाले असून न्यायालयाने पुढील तारीख दिली आहे. यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून कितीही पैशाच्या जोरावरजोरावर दाबण्याचा प्रयत्न केला तरी यांना शिक्षा ही होणार निश्चित असल्याचे पाटील सांगीतलं.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष सदा भिसे, उपाध्यक्ष दता गुरव, सचिन पसारे, पवन तावदारे, अनिल शिंदे, सचिन चौगुले, सुभाष आवटी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी न्यायालय आवारात उपस्थित असलेले प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे २०११ मध्ये माणकापुर स्टार फॅक्टरीमध्ये झालेल्या कामगार मारामारी संदर्भात विचारले असता सदर विषय न्यायप्रविष्ट असुन यावर जास्त न बोललेचं बरे आणि हे प्रकरण कामगार माराहाण प्रकरण आहे. या गोष्टीशी आपला कांहीही संबध नसताना ही मला या प्रकरणी गोवण्यात आल्याचे ते सांगितले.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

आणखी अपडेट्‌ससाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावरती सभासद व्हा. आणि मिळवा परिसरातील ताजे अपडेट्‌स केवळ एका क्लिकवर.

11-Oct-2018चिकोडी Yuvarajya News Network
Top