या मराठी भाषिक गावात साजरा होणार कर्नाटक राज्योत्सव दिन

news_620

गेल्या पंधरा दिवसांपासुन नियोजन ; मलिकवाड नगरीने निर्माण केला आदर्श

राजेंद्र केरुरे : युवाराज्य न्युज विशेष

कर्नाटकाच्या शेवटच्या टोकावर असणारे चिकोडी तालुक्यातील मलिकवाड या संपुर्ण मराठी भाषिक गावात गेल्या कांही वर्षांपासुन कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करण्यात येत होता. मात्र त्यावेळी कांही मर्यादित युवकांच्या सहभागातुन साजरा होणारा कर्नाटक राज्योत्सव दिन यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथे कोणताही भेदभाव न करता कन्नड-मराठी भाषांचा अभिमान एकत्रीत दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासुन सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात अडकलेल्या बेळगाव सिमाप्रश्नामुळे कर्नाटक-महाराष्ट्र वाद नेहमीच विकोपाला जात असतो. यामुळे अनेक दुर्घटनांना बेळगावसह सिमाभागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी कन्नड आणि मराठी भाषिक नागरिकांत जणु दुश्मनी असल्यासारखे वागणे आपल्याला पहावयास मिळत आहे. मात्र हीच परस्थिती आपल्या गावात वेगळी असल्याची प्रकर्षाने दरवर्षी मलिकवाड नगरीतुन दाखविले जात आहे.

सैनिकी परंपरेच कर्नाटक -महाराष्ट्र सिमेवर हे गाव वसले आहे. येथील शेकडो जवान देशाच्या संरक्षणार्थ सिमेवर पहारा देत असतात. तर माजी सैनिकांची ही संख्या येथे अधिक आहे. याचबरोबर विविध क्षेत्रात आपली यशस्वी छाप उमटविणाऱ्या गाव संपुर्ण मराठी भाषिक गाव आहे. येथील सर्वाधिक नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. मात्र येथील प्रत्येक नागरिक आपण कर्नाटकात असल्याचा अभिमान उराशी बाळगुन असतो. आणि येथे कन्नड मराठी असा कोणताही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहताना येथील नागरिक दिसतात. अशा या मराठी भाषिक गावात कर्नाटक राज्योत्सव दिन अभिमानाने आणि मोठ्या जल्लोषात करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासुन युवक धडपडत आहेत. यामुळे भेदभाव करणाऱ्या अनेकांपुढे राज्याचा गर्व अभिमान वाढविणारी भावना निर्माण होत आहे. या मराठी भाषिक गावातील उपक्रमाचा कन्नडप्रेमींसह सर्वसामान्य नागरिक आणि मराठी भाषिकांतुन ही स्वागत होत आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा. www.yuvarajyanews.com

29-Oct-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top