अहो मी जलदाता बंधारा; माझ्याकडं थोडं लक्ष द्या ना राव...? - युवाराज्य न्युज

news_622

मलिकवाड- दतवाड बंधारा बनला धोकादायक ; दुरुस्तीसाठी प्रशासनाला आर्त हाक

युवाराज्य न्युज : मलिकवाड

मलिकवाडसह एकसंबा, नणदी, नणदीवाडी, नागराळ, हिरेकोडी, यादनवाडी, वडगोलसह परिसरासाठी वरदानदायी ठरलेल्या दुधगंगा नदीचा मी पुल वजा बंधारा. अरे माझी वाताहात झालेली पाहिली का तुम्ही....? माझ्यामुळे कुणाच्यातरी जीवाला धोका निर्माण झाला आहे. बघा की राव लवकर इकडं.... आवाज उठवा की माझ्याबद्दल ही थोडं ... आणि मला दुरुस्त करा ना राव.... अशी आर्त हाक देतोय मलिकवाड-दतवाड दरम्यानचा पुल वजा बंधारा...!

गेल्या कांही दिवसांपासुन मलिकवाड येथील दुधगंगा नदीवरील बंधारा संपुर्ण खचला आहे. बंधाऱ्यावरील काँक्रीट उखडल्याने आत असणाऱ्या सळई, तारा बाहेर आल्या आहेत. परिणामी अनेकांना लहान मोठ्या इजांनाही अनेकवेळा सामोरे जावे लागत आहे. बंधाऱ्यावर असणारी संरक्षक कठडे अनेकदा पुलावर येणाऱ्या पाण्याने वाहुन गेल्या आहेत. पुलावर ठिकठिकाणी मोठ मोठी खड्डे पडली आहेत. यामुळे एक खड्डा चुकविण्यास जाताना तोल गेल्यास निष्पाप वाहनधारकांना जीव गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हा पुल वजा बंधारा कर्नाटक-महाराष्ट्राला जोडणारा दुवा मानला जातो. यामार्गावरुन नागरिकांची मोठी वर्दळ असते. दरम्यान रात्रीच्या वेळी महाराष्ट्रातुन येणाऱ्या प्रवाशांसाठी हे पुल अतंत्य धोकादायक बनले आहे. रस्ता उतरतीला असुन रस्ता संपताच पुलावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्‌डयात चुकुन जरी वाहन गेल्यास नदीत पडण्याची श्यकता आहे. त्या ठिकाणासह बंधाऱ्यावरील बहुतांश कठडे वाहुन गेल्याने बंधाऱ्याची वाताहत झाली आहे. यामुळे दुरुस्तीसाठी आर्त हाक देत असलेल्या पुलाकडे संबधित अधिकारी, जनप्रतिनिधी लक्ष देणार का....? काय कोणाचा तरी जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा सवाल आता व्यक्त होऊ लागला आहे.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

31-Oct-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top