सिमाभागाचे राजकारण ढवळुन निघेल ; नेते तुरुंगात जातील

news_625

नणदी येथे कृष्णात डोणे महाराजांची भाकणुक ; हालसिध्दनाथ यात्रेची सांगता

युवाराज्य न्युज : नणदी

राजकारणात मोठा गोंधळ होईल, राजकिय नेते मोठे उड्डाण घेतील, संपतीच्या मागे लागतील, नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस येतील,नेते तुरुंगात जातील, कर्नाटकात सत्तेपासुन मोठा पक्ष दुरु राहील, सिमाभागाचे राजकारण ढवळुन निघेल अशी भाकणुक केली आहे कृष्णात डोणे महाराजांनी.

नणदी येथील हालसिध्दनाथ यात्रेनिमित शनिवारी पहाटे झालेल्या भाकणुकीत कृष्णात डोणे महाराजांनी राजकारण, अर्थकारण, दहशतवाद, शेतकरी, जातीभेद, देवदेवतांवरील संकटे, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजी-मंदी, जाती-धर्मातील वैरत्व, सिमाभागाचा गोंधळ अशा विविध विषयांवर नाथांची भाकणुक केली. त्याचा घेतलेला सविस्तर आढावा....

श्रावण महिन्यात गायी गंगेला जातील. पाऊस पाऊस अन पाणी पाणी अशी कालवा कालव कराल. धर्माचा पाऊस अन कर्माचं पीक पडेल. उन्हाळयाचा पावसाळा व्हईल. पावसाची वाट बघता बघता युध्द होतील, रक्ताचे पाट वाहतील. पंच लोक दोन्हीकड लाच खाऊन भांडणे लावतील, चौथाई भाग ओसाड पडलं. पैशाच्या जोरावर न्याय मिळलं.अंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील. कामगार लोक दडुन बसतील.संप हरताळाची वेळ येईल. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला जन्माला येतील. शिवाजी महाराजांचा जयजयकार करा.भगवा झेंडा राज्य करेल.

दागिने,पैसा मानसाला घातक ठरेल. महागाईचा भस्मासुर सुटेल.रेल्वे,मोटार यांचे अपघात व्हतील. लाचलुचपत भ्रष्टाचाराला ऊत येईल. सागरात लोकांच्या हत्या होतील. पैसा न खाणारा माणुस सापडणार नाही. सामान्य माणसाचे जगणं मुश्कील बनणार आहे. बांधा आड बांध शिवा आड शिवं ....रोहीणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा.साधलं तो सज्जन. हातात भाकरी खांद्यावर चाबुक..साधलं तो साधलं.

जगात धर्म बुडुन गेला आहे.पाच ही बोटाने मानवाने धर्म करावा. नऊ वर्षांची मुलगी भरतार मागेल. १२ वर्षांची मुलगी आई व्हईल. कोल्हापुरच्या अंबाबाईला मोठे संकट पडले आहे. रात्री १२ च्या वेळेला तिच्या डोळयातुन पाणी पडत आहे. रसायन धान्य उदंड पिकलं. मोलान विकलं रसाला धारणं माणसाला मरण, ऊसाचा काऊस व्हईलं सडकंवर पडलं.
ऊस कारखान्याचा व्यवस्थापक आनंदात राहिल. साखरेचे भाव तेजी-मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांक गाठेल, ऊसाच्या कांड्यांन आणि दुधाच्या भांड्यानं गोंधळ माजवेल, ऊसाचा दर साडेतीन हजारावरुन चार हजारांवर पोहचलंऽ. आंदोलन व्हतील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत व्हईल.तंबाखुची पेंढी मध्यमं विकल. मोलानं विकलं. याच्या सेवनाने मानवाला रोग येईल.
चालत्या बोलत्या माणसाचा प्राण जाईल. १८ तऱ्हेचे आजार माणसाला येतील. बाहेर गेलेले माणुस परत येईल याची शाश्वती नाही. मेंढीच्या पोटी मुलगा जन्म घेईल. बसवराजा पालखीतुन मिरवलं.निपाणी भागात मोठा गोंधळ होईल.अतिरेकी लोक घोटाळा करतील. बॉम्बस्फोट होऊन शहरे उध्वस्त होतील.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

04-Nov-2018नणदी Yuvarajya News Network
Top