धार्मिक कार्यक्रमांनी नणदीच्या हालसिध्दनाथांची यात्रा उत्साहात

news_626

गरम अन्न भंडाऱ्यासह हातुन दान करणारा थरारक अनुभव; अंबिल घागरींची सवाद्यांसह मिरवणुक

युवाराज्य न्युज : नणदी

नणदी येथील ग्रामदैवत श्री हालसिध्दनाथ देवाची यात्रा माजी आमदार श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर नणदीकर यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांनी भंडाऱ्याच्या उधळणीत उत्साहात पार पडली. दरम्यान नणदीसह परिसरात धार्मिक वातावरणाची नांदी पहायला मिळाली.

२ रोजी सकाळी देवाची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर ढोल वादनासह श्रीमंत अजितसिंह निंबाळकर सरकार यांच्या वाड्याकडे वालुग नेण्यात आले. तेथे ढोल वादनाचा कार्यक्रम होताच श्रीमंत अजितसिंह सरकारांच्या वाड्यावरील मानाच्या पाच अंबिल घागरींचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ढोल वादन, सनई चौघडासह वाद्यांच्या गजरात गावातील हजारो सुहासिनी महिलांकडुन भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी वाड्यासमोरी सुमारे २०० मीटरपर्यंत गावातील नागरिक दोन्ही बाजुला ऊस घेऊन थांबले होते. यामधुन होत असलेली या मिरवणुकीत घोड्याचा नृत्य ही मुख्य आकर्षण बनले होते.

मिरवणुक मंदिराजवळ येताच श्रीमंत नणदीकर सरकारांच्या कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली अंबिल घागरींना मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्धबीर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार अजितसिंह निंबाळकर यांच्याहस्ते मंदिरातील सर्व देवतांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर पालखीत ही विधीवतपणे पुजन करण्यात आले. दुपारी श्रीमंत अजितसिंह निंबाळकर यांनी महाप्रसादासाठी केलेल्या अन्नपात्रामध्ये भंडारा उधळला. त्यानंतर मानकरींच्या हातामध्ये भंडारा देताच त्याच हाताने गरम अन्न भंडाऱ्यासह ताटामध्ये वाढण्यात आला. आणि हा थरारक अनुभव अनेकांच्या अंगाचा थरकाप उडविणारा ठरत असतो. मंत्रोच्चारानंतर सरकारांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण होताच एकाच वेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शनिवार ३ रोजी पहाटे भाकणुकीचा कार्यक्रम तर सायंकाळी पालखी प्रदक्षिणेने यात्रेची सांगता करण्यात आली.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

04-Nov-2018नणदी Yuvarajya News Network
Top