गळतग्यात ऐतिहासिक चतुर्मास महामहोत्सवाची सांगता

news_627

१० दिवसांपासुन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

वैभव खोत : युवाराज्य न्युज,गळतगा

गेल्या दहा दिवसांपासुन गळतगा येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात भरगच्च धार्मिक कार्यक्रमांनी रंगलेला ऐतिहासिक चातुर्मास, कल्पद्रुम महामहोत्सव व दिक्षा समारंभाचा नुकताच सांगता करण्यात आली. या कार्यक्रमामुळे गळतगासह परिसरात धार्मिक वातावरणाची नांदी पहायला मिळाली. दरम्यान प.पु आचार्य १०८ वैराग्यनंदी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भोज येथील माजी सैनिक आण्णासाहेब ऐतवडे यांना मुनी दिक्षा देण्यात आली.

दहा दिवस रंगलेल्या या कार्यक्रमाला २२ रोजी सकाळी मंदिराच्या पुढे, मंडपापुढे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मंगलकलश मिरवणुक आणि दिपप्रज्वलनाने विधान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर झालेल्या दहा दिवसांच्या कार्यक्रमांत दहा यजमान, दहा धनपती कुबेर अष्टकुमारीकांच्या हस्ते धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी दररोज पंचामृत अभिषेक, विधान पुजा, हत्तीवरुन देवावर पुष्पवृष्टी, सायंकाळी सवाद्यांसह मिरवणुक काढण्यात येत होती. मिरवणुकीत ९ घोडे, १ हती, २ रथ, २ बँडसह सनई चौघडा अशा वाद्यांचा मेळ सहभागी झाला होता.
२६ रोजी आचार्य वैराग्यनंदी महाराजांच्या जन्मदिनानिमित्य १०८ ढोल ताशा आणि झांज पथकांच्यासह महाराजांची भव्य सत्संग मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान देवाला विशेष पुजा, मंगलपुजन करण्यात आले. २९ रोजी मौजीबंधन, राज्याभिषेक व सभा,संघ पुजन करण्यात आले. ३० रोजी पिच्छी परिवर्तन आणि वस्त्रदान करण्यात आले.

यावेळी भोज येथील माजी सैनिक आण्णासाहेब ऐतवडे हे सन्यास घेत जैन मुनी दिक्षा घेतले. दरम्यान वैराग्यनंदी महाराजांच्या दिव्यसानिध्याखाली त्यांचे मंगलस्थान, त्यांच्या हस्ते देवाला पंचामृत महाभिषेक त्यानंतर त्यांचे केशलोचन, वस्त्रत्याग आणि त्यांना नियम समजुन देत दिक्षा देण्यात आली. दरम्यान त्यांचे श्रीकारनंदी महाराज असे नामकरण करण्यात आले. सायंकाळी या दिक्षार्थींची गावातील प्रमुख मार्गावरुन भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.

विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगलेल्या या चातुर्मास महोत्सवामुळे गळतगासह परिसराला धार्मिक वातावरण प्राप्त झाले होते. दरम्यानच्या सर्व कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित होत्या.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

05-Nov-2018गळतगा Yuvarajya News Network
Top