थकित बिल दिल्याशिवाय ऊसाचे कांडे ही देणार नाही : सुभाष चौगुलेंचा इशारा

news_628

गळतग्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद

वैभव खोत : युवाराज्य न्युज गळतगा

गत गळीत हंगाम्यातील ऊसाचे थकित बिले अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत ही कारखानदारांनी वेठीस धरले आहे. यामुळे सर्वप्रथम थकित बिले अदा करावीत. व यंदाचा एफआरपी अधिक दोनशे असा दर जाहिर करावा अन्यथा सिमाभागातील एकही कारखान्याला ऊसाचे कांडे ही देणार नसल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष चौगुले यांनी दिला आहे.

गळतगा येथील जैन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले, गेल्या कांही दिवसांपुर्वी निपाणी तहसिलदारांना थकित ऊस बिलाबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय जाहीर न झाल्याने शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. मागील वर्षीचे थकित बिल दिल्याशिवाय आणि यंदाचा ऊसाचा दर जाहिर केल्याशिवाय ऊस तोड होऊ देणार नाही. जर तोडी देऊन वाहतुक करण्याचा प्रयत्न केल्यास कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडी, नुकसानीला कारखाना जबाबदार राहील असा इशारा देत मंगळवारी सकाळी १० वा. भोज क्रॉस येथील चक्री झाड परिसरात करण्यात येणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
नुकताच जयसिंगपुर येथे झालेल्या ऊस परिषदेत खासदार राजु शेट्टी यांनी केलेल्या मागणी नुसार ३२१७ रुपयांचा दर जाहीर करुनच कारखान्यांनी ऊस तोडी सुरु कराव्यात असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

पत्रकार परिषदेस रमेश पाटील, किरण माणगावे, प्रकाश तेरदाळे, तात्यासाहेब केस्ते, सुकमार उगारे, शांतीनाथ चिनगे, एन.आय खोत यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

05-Nov-2018गळतगा Yuvarajya News Network
Top