मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आटोपली मलिकवाडची ग्रामसभा

news_629

अधिकारी ही अनुपस्थितीत ; विविध समस्यांवर चर्चा

युवाराज्य न्युज : मलिकवाड

जेमतेम पंधरा ते वीस नागरिकांच्या उपस्थितीतच आमचे गाव आमची योजना अंतर्गत आयोजित ग्रामसभा आटोपण्याची नामुष्की मलिकवाड ग्राम पंचायतीवर ओढविली आहे. गावात डंगोराद्वारे ग्रामसभेची माहिती देऊनही बहुतांशी लोक ग्रामसभेकडे पाठच फिरवल्याचे चित्र आजच्या ग्रामसभेत पहायला मिळाले आहे. आणि मुख्यत: या सभेकडे विविध खात्यांचे अधिकारी ही अनुपस्थित राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रारंभी सक्रेटरी मल्लिकार्जुन कांबळे यांनी स्वागत केले. सभेला उद्देशुन राजेंद्र पाटील म्हणाले, गावातील आजी-माजी सैनिकांनी स्वच्छता मोहिम राबविल्याने गाव स्वच्छ सुंदर बनले आहे. मात्र या त्यांच्या कार्याला ग्रामस्थांनी ही सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्राम पंचायत सदस्य अविनाश खोत म्हणाले, गावाला हागणदारीमुक्त गाव म्हणुन १० लाखांचा निधी मिळाला आहे. मात्र आजही अनेक नागरिक उघड्यावर शौचालयास बसतात. त्यामुळे नागरिकांनी गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पीडीओ अशोक होणवाड यांनी गावच्या विकासात ग्रामस्थांचे सहकार्य मुख्य पात्र भुषविते. यासाठी कोणत्याही विकासकामांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे. व पाणी पट्टी, घरफाळा भरुन सहकार्य करावे अशी विनंती केली.

बाळु तहसिलदार यांनी नुतन इमारतींचे लवकरात लवकर उदघाटन करण्यात यावे. तसेच चंद्रकांत शिरोळे यांनी गावातील मुख्य रस्ता दुरुस्त करताना डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करीत गटार कामासाठी पंचायतीकडुन राखीव निधी ठेवण्यात यावा अशी मागणी ही केली.

दरम्यान आरोग्य खात्याचे मज़ुनाथ गळतगे, नोडल अधिकारी एस.एस कुंभार यांनी आपल्या खात्याच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

05-Nov-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top