मलिकवाडमध्ये आजपासुन रंगणार MPL क्रिकेटचा थरार

news_630

मलिकवाडच्या शहीद भगतसिंग मैदानावर आयोजन

युवाराज्य न्युज : मलिकवाड

मलिकवाड येथील प्रत्येक क्रिकेट खेळाडुला प्रोत्साहीत करण्यासाठी गावपातळीवर आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणारा एमपीएलचा थरार आजपासुन मलिकवाडकरांना अनुभवयास मिळणार आहे. मलिकवाडच्या शहीद भगतसिंग मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या एमपीएलचा अनुभव अनेक खेळाडुंना पर्वणी ठरत आहे. येथील मान्यवरांना प्रत्येक टीमच्या स्पॉन्सरशिप देण्यात येते. त्यानुसार संघ निवडुन दरवर्षी सलग तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत चुरशीचे सामने खेळविले जातात. ही स्पर्धा अतंत्य चुरशीची होते. संघ निवडीपासुन संपुर्ण स्पर्धा संपेपर्यंत स्पर्धेचे नियोजन आयपीएलच्या धर्तीवर करण्यात येते. यामुळे ही स्पर्धा मलिकवाडकरांच्या औत्सुक्यतेची बनली आहे. यंदा प्रत्येक संघातील खेळाडु वेगवेगळया रंगांची टी शर्ट परिधान करण्यात असल्याने सांघीक खेळाडु ही ओळखण्यास मदत होणार आहे.

या स्पर्धेसाठी गेल्या महिनाभरापासुन गावातील युवक तयारीला लागले आहेत. स्पर्धेची संपुर्ण तयारी अंतिम टप्प्यात आले असुन आज सायंकाळी या स्पर्धेचे उदघाटन शहीद भगतसिंग मैदानावरती होणार आहे. मलिकवाडकरांच्या औत्सुक्यतेचा विषय बनलेल्या एमपीएल २०१८ चा मानकरी कोण होणार हे पाहावे लागणार आहे.


आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

05-Nov-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top