नणदीत विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण - युवाराज्य न्युज

news_631

युवाराज्य न्युज : नणदी

नणदी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण नुकताच करण्यात आले. दरम्यान शैक्षणीक प्रगतीसाठी सायकलींचा सदुपयोग करावा असे आवाहन एसडीएमसी अध्यक्ष राजु चव्हाण यांनी केले.

शासनाकडुन वितरीत करण्यात येणाऱ्या सायकलींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेला येण्यास मदत होत असुन विद्यार्थ्यांना सायकलींमुळे शिक्षणाची गोडी लागत असल्याचे मत ही मुख्याध्यापक मधाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य विलास चव्हाण, सुनिल सुर्यवंशी, राजु देसाई, बाबासाब देसाई, शहाजीराव सुर्यवंशी, चिदानंद जिरगे, मल्लाप्पा हजारे, सहशिक्षक राजु ठोंबरे, दिनकर सर यांच्यासह विद्यार्थी,पालक उपस्थित होते.

आपल्या ही परिसरातील बातम्या, समस्या आणि लेख प्रसिध्दीसाठी सज्ज आहे आपल्या हक्काचं दमदार न्युज नेटवर्क युवाराज्य न्युज. यासाठी आमच्या 7028140801 या What's app क्रमांकावर संपर्क करा

06-Nov-2018नणदी Yuvarajya News Network
Top